Join us
Daily Top 2Weekly Top 5

किती ही अंधश्रद्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 00:54 IST

एकता कपूर अक्षरांच्या गणिताला मानते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ती आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचे नाव हे पंडिताला विचारूनच ठेवते, असे म्हटले जाते. तिचा एक नवा कार्यक्रम काहीच दिवसांत

एकता कपूर अक्षरांच्या गणिताला मानते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ती आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचे नाव हे पंडिताला विचारूनच ठेवते, असे म्हटले जाते. तिचा एक नवा कार्यक्रम काहीच दिवसांत सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे नाव काही दिवसांपूर्वीच ठरवण्यात आले होते. त्यानुसार, कार्यक्रमाचे प्रमोशनही सुरू होते, पण आता हा कार्यक्रम सुरू व्हायला अगदी काही दिवसच असताना अचानक या कार्यक्रमाचे नाव बदलण्यात आले. एकताच्या पंडितांनी तिला कार्यक्रमाचे नाव बदलायला सांगितले असल्याचे कळतेय.