Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा हेगडेला कसा मिळाला ‘मोहेंजोदडो’?

By admin | Updated: July 13, 2016 01:29 IST

गोड चेहऱ्याची पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करते आहे. पहिल्याच बॉलीवूडपटात पूजाला हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, यामुळे पूजा जाम खूश आहे

गोड चेहऱ्याची पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करते आहे. पहिल्याच बॉलीवूडपटात पूजाला हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, यामुळे पूजा जाम खूश आहे, पण तुम्हाला माहित आहे, या चित्रपटासाठी पूजाची निवड कशी झाली? ‘मोहेंजोदडो’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पूजाला या चित्रपटात कशी संधी मिळाली, ते सांगितलेय. या चित्रपटातील चानीच्या भूमिकेसाठी आशुतोष यांना एक नवा चेहरा हवा होता. असा चेहरा, जो चानीसारखा दिसेल. करारी, आत्मविश्वास व तेजाने भरलेला आणि तरीही निष्पाप. आशुतोष अशा चेहऱ्याच्या शोधात होते. याच दरम्यान, आशुतोषची पत्नी सुनीता यांना रणबीर कपूरसोबतच्या एका कारच्या जाहिरातीत पूजा दिसली. हीच चानी असे सुनीता यांना वाटले. आशुतोष यांनाही सुनीताची निवड आवडली. तिच्यातील स्क्रीन प्रेझेन्स त्यांना आवडला आणि आशुतोष यांना ‘मोहेंजोदडो’साठी हीरोईन मिळाली. आशुतोष यांनी लगेच पूजाला बोलवले. आॅडिशन्स झाली आणि पूजाने हा चित्रपट साइन केला. एकंदर काय, तर बायकोची निवड आशुतोष यांना भावली, असेच म्हणावे लागेल.