ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - 'उडता पंजाब' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाच्या भुमिकेवरुन वाद-विवाद सुरु आहेत. चित्रपटांमधील सेन्सॉर बोर्डाचा हस्तेक्षेप नेमका किती आणि कसा असावा ? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. सेन्सॉर बोर्डाला आक्षेप असल्यास त्यांनी तो घेणे आणि चित्रपटाला त्यानुसार प्रमाणपत्र देऊन रिलीजला परवानगी देणे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. मात्र 'उडता पंजाब' चित्रपटात 89 कट्स सुचवणा-या सेन्सॉर बोर्डाची भुमिका ठराविक चित्रपटांपुरतीच मर्यादित आहे का ? असा सवाल विचारला जात आहे.
सेन्सॉर बोर्डाने काही चित्रपट ज्यांच्यावर कात्री चालवणं अपेक्षित होतं त्यांच्यावर काहाही आक्षेप ने घेता हिरवा कंदिल दाखवला. उडता पंजाबच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दिलेले असे काही चित्रपट पाहूया ज्यांच्यावर आक्षेप घेणं अपेक्षित होतं.
1) मस्तीजादे
या चित्रपटच्या पोस्टवरुन अंदाज लावू शकतो की चित्रपटामध्ये काय असेल...या चित्रपटाला फक्त कॉमेडी चित्रपट म्हणणं कमीपणाचं होईल. चित्रपटाच्या पोस्टरमध्येच आक्षेप घेण्याइतका अनेक गोष्टी आहेत. चित्रपटाचा ट्रेलरदेखील जेव्हा आला होता तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर अश्लिल चाळे करणारे सीन्स दाखवण्यात आले होते. चित्रपटात तर अॅडल्ड कॉमेडीला मागे टाकेल असे सीन्स, डायलॉग होते. जर या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाला काही आक्षेपार्ह नाही आढळलं तर मग उडता पंजाबमध्ये का आढळलं असावं ?
2) दिल्ली बेली
भाग डी के बोस डी के भाग...हे गाणं सर्वांनाच आठवत असेल...गाण्याच्या नावाखाली सरळ सरळ शिवीच घालण्यात आली होती... या गाणं अनेकांना आवडलं असल तरी काहींनी मात्र यावर आक्षेप घेतला होता. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने आपला भाचा इमरान खानसोबत केलेला हा पहिला आणि कदाचित शेवटचा अॅडल्ड चित्रपट. याअगोदर इमरान खानने सर्व चित्रपटांमध्ये गुड बॉयच्या भुमिका केल्या होत्या त्यामुळे हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज होता. दिल्ली बेली चित्रपटातील गाण्यांपासून ते संवादापर्यंत अनेक ठिकाणी अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला होता.
3) क्या कुल कै हम 3
'मस्तीजादे' चित्रपट रिलीज केल्याच्या दुस-याच आठवड्यात 'क्या कुल कै हम 3' चित्रपट रिलीज करण्यात आला होता. ज्याप्रमाणे 'मस्तीजादे' चित्रपटात अश्लीलता दाखवण्यात आली होती त्याचप्रमाणे या चित्रपटात फक्त आणि फक्त अश्लीलताच दाखवण्यात आली. कमरेखालचे विनोद तर सर्रास मारले गेले होते. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी हा चित्रपट म्हणजे 'मस्तीजादे'चा रिमेक असल्याची खिल्ली उडवली होती.
4) गो गोवा गॉन
सैफ अली खान आणि कुणाल खेमू यांच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपटांमधील एक 'गो गोवा गॉन'. चित्रपटामधून पहिल्यांदाच झोम्बींची संकल्पना बॉलिवूडमध्ये आणली गेली. चित्रपटात गोवामधील ड्रग्ज रॅकेटदेखील दाखवण्यात आलं होतं. आता जर गोव्यातील रेव्ह पार्टीज आणि ड्रग्ज रॅकेट दाखवण्यात आले असतील आणि तेदेखील चित्रपटाच्या नावात 'गोवा' असा उल्लेख करत तर मग 'उडता पंजाब'मध्ये काय समस्या आहे. गोव्यामधील ड्रग्ज समस्या दाखवायला हिरवा कंदील दिला आणि तोदेखील 'गोवा' नावासोबत मग त्याच समस्येवर बनवण्यात आलेल्या 'उडता पंजाब' चित्रपटातील पंजाब नावावर आक्षेप का ?
5) जिस्म 2
एकेकाळी पॉर्न स्टार असलेली अभिनेत्री सनी लिओनीचा 'जिस्म 2' चित्रपटातील बोल्ड अंदाज ट्रेलरमधूनच दिसला होता. मात्र चित्रपटाला फक्त 'ए' सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्यात आलं होतं. 'उडता पंजाब' चित्रपटात 89 कट्स सुचवणा-या सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट कसा काय चालला याचंच आश्चर्य