Join us

तिकीटबारीवर 'हाऊसफुल्ल ३' सुसाट, ३ दिवसात ५२.७५ कोटींची कमाई

By admin | Updated: June 6, 2016 18:02 IST

३ जुन रोजी याच साखळातील 'हाऊसफुल्ल ३' हा सिनेमा प्रदिर्शित झाला. या सिनेमाला देखिल प्रेक्षकांनी पसंदी दर्शवली आहे. सिनेमाने या विकेंडला ५० कोटीं पेक्षा जास्त गल्ला जमवत चांगली सुरवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : गेल्या काही दिवसापूर्वी आलेले अभिनेता अक्षयकुमारचे हाउसफुल आणि हाउसफुल-२ हे सिनेमे बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरले होते. हाउसफुल आणि हाउसफुल-२ या सिनेमाना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. ३ जुन रोजी याच साखळातील 'हाऊसफुल्ल ३' हा सिनेमा प्रदिर्शित झाला. या सिनेमाला देखिल प्रेक्षकांनी पसंदी दर्शवली आहे. सिनेमाने या विकेंडला ५० कोटीं पेक्षा जास्त गल्ला जमवत चांगली सुरवात केली आहे. पहिल्या दिवशा सर्वात जास्त कमाई शाहरुख खानच्या फॅन या सिनेमाने केली होती, त्याने तिकिटखिडकीवर १९ कोटींचा गल्ला जमवला होता, त्यांनतर आता या वर्षीचा दुसरी मोठी ओपनिंग हाऊसफुल ३ या चित्रपटाने केली आहे. 
 
फरहाद-साजिद जोडीने दिग्दर्शित केलेला 'हाऊसफुल्ल ३' या मल्टीस्टारर चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भुमीकेत आहे. त्याच्या कॉमेडीला प्रेषकांनी चागंलीच दाद दिल्याच तिकिटखिडकीवरील कलेक्शन वरुन दिसते आहे. 'हाऊसफुल्ल ३' चित्रपटाने सुक्रवारी १५.२१ कोटी, शनिवारी १६.२५ कोटी आणि रविवारी २१. २५ कोटी रुपयांची कमाई करत आठवड्याच्या शेवटी एकूण कमाई ५२.७५ कोटीं रुपये झाली आहे. 
 
 
अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभीषेक बच्चन, जॅकलीन, लिसा हेडन, नरगिस फाकरी, बोमन इराणी आणि जॅकी श्रॉफ अशी तगडी स्टार कास्ट 'हाऊसफुल्ल ३' या सिनेमात आहे. 
 
कलाकारांच्या अभिनयाबाबत बोलायचे झाल्यास अक्षय कुमारने आपली भुमीका उत्तम केली आहे, अशा भूमिका सुंदर रीतीने साकारतो. या वेळीही त्याने भुरळ घालेल असा अभिनय केला आहे. रितेश देशमुखनेही चांगला अभिनय केला आहे. मात्र, ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेकने पुन्हा एकदा निराशा केली. कॉमेडीपासून रोमान्सपर्यंत सर्वत्र त्याचा अभिनय फिका वाटतो. अभिषेकला कॅमेऱ्यासमोर काहीतरी होते आणि तो अभिनय करायचे विसरतो, असे वाटते. तिन्ही नायिका केवळ ग्लॅमरसाठी असून त्या तेच काम करतात. नर्गिस आणि लिसा हेडन यांचा अभिनय कुठेही दिसत नाही. दोघींची संवादफेक अत्यंत वाईट आहे. बोमन इराणी आणि जॅकी श्रॉफने आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे.