Join us

५२ वर्षांपूर्वीचा सर्वात भयानक हॉररपट! चित्रपट पाहणाऱ्यांसोबत घडलेल्या विचित्र घटना, कुणाला हार्ट अटॅक आला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:10 IST

५२ वर्षांपूर्वीचा सर्वात भयानक हॉररपट! चित्रपट पाहणाऱ्यांसोबत घडलेल्या विचित्र घटना, कुणाला हार्ट अटॅक आला तर...

Hollywood Movie: चित्रपटांच्या दुनियेत जेव्हा सत्य घटनांनी प्रेरित कथा जेव्हा पडद्यावर प्रेक्षकांसमोर आणल्या जातात. तेव्हा रोमाचं कित्येक पटींनी वाढतो. ओटीटीच्या या काळात एकामागोमाग एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र,त्यांच्यामध्ये पूर्वीच्या चित्रपटांसारखा थरार आणि काळजाचा थरकाप उडवणारे सीन्स फार कमी पाहायला मिळते. आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ५२ वर्षांपूर्वीच्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे.  

'द एक्सॉर्सिस्ट' असं या भयपटाचं नाव आहे. हा चित्रपट १९७३  मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेले हॉरर सीन्स आणि भूतबाधेचे प्रकार यामुळे हा सिनेमा आजही सर्वात भयानक भयपटांपैकी एक मानला जातो. 'द एक्सॉर्सिस्ट'ची कथा खूप भयानक आहे. चित्रपटाच्या कथेत एक निरागस मुलगी दाखवण्यात आली आहे. या मुलीवर  एक वाईट आत्मा कब्जा करतो. त्यानंतर या मुलीची आई तिचं विचित्र वागणं  तिला एका पाद्रीला दाखवते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य काळजाचा थरकाप उडवणारे आहेत. विल्यम फ्रेडकिन दिग्दर्शित 'द एक्सॉर्सिस्ट' ला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. हा हॉरर चित्रपट शापित चित्रपटदेखील मानला जातो. याचं कारण म्हणजे असंही सांगण्यात येतं हा चित्रपट पाहून अनेकांना हृदयविकाराचा झटका आला. थिएटरमध्ये लोकांना उलट्या होऊ लागल्या. काहींना अस्वस्थ वाटत होते तर काहींना गुदमरल्यासारखं वाटत होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : The Exorcist: A terrifying film haunted by real-life horrors.

Web Summary : 1973's 'The Exorcist' remains a horror classic due to its terrifying scenes of demonic possession. The film, directed by William Friedkin, features a possessed girl. Reportedly, viewers experienced heart attacks and sickness during screenings, adding to its ominous reputation.
टॅग्स :हॉलिवूडसिनेमा