Join us

चित्रपटासाठी काय पण! एका सीनसाठी उडवली अख्खी ट्रेन, पाहा Tom Cruise चा खतरनाक स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:48 IST

Tom Cruise Mission Impossible 7 Action Scenes: या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट Mission Impossible 7 येत्या 12 जुलै रोजी रिलीज होत आहे.

Tom Cruise Dangerous Stunt:हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुझ (Tom Cruise) त्याच्या अॅक्शन चित्रपटासाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात तो स्वतः धोकादायक स्टंट करत असतो. त्याच्या आगामी मिशन इम्पॉसिबल 7(Mission Impossible-7) मध्येही टॉमने स्वतः सर्व धोकादायक स्टंट केले आहेत. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या 12 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटात एका सीनसाठी खऱ्या ट्रेनचा चुराडा केला आहे. नुकताच या चित्रपटातील बिहाइंड द सीन व्हिडिओ समोर आला आहे.

सूमारे तीन दशकांपासून टॉम क्रुझ मिशन इम्पॉसिबल सीरिजमधून चाहत्यांचे मनोरंजन करत आलाय. आता या सीरिजचा 7 वा भाग 12 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातही टॉमने अत्यंता धोकादायक स्टंट केले आहेत. यातील एका स्टंटमध्ये एक नवीन ट्रेन ब्रिजवरुन खाली पाडण्यात आली आहे. इतर चित्रपटांमध्ये ट्रेनच्या सीनसाठी VFX किंवा डमी ट्रेनचा वापर केला जातो. पण, या चित्रपटात एक नवीन ट्रेन तयार करण्यात आली आली होती. 

टॉम क्रुझने या चित्रपटातील बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅक्शन सीनसाठी एक नवीन ट्रेन बनवलेली दिसत आहे. ही ट्रेन साधी सुधी नसून अत्यंत लक्झरी आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी नक्कीच करोडो रुपये खर्च केले असतील. व्हिडिओमध्ये या ट्रेनवर एक फाईटसीनदेखील शूट झाला आहे. यानंतर ही ट्रेन अतिशय उंचावरुन खाली पाडण्यात आली आहे. यात ट्रेनचा चुराडा झाला आहे.  

टॅग्स :हॉलिवूडबॉलिवूडआंतरराष्ट्रीय