Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द असॅसिन' नव्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेटेड फीचरची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:39 IST

The Assassin : ‘द असॅसिन’ या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्मचे अनावरण गोवा फिल्म फेस्टिव्हल आणि को-प्रोडक्शन मार्केटमध्ये करण्यात आले.

भारतीय अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील आघाडीची संस्था ग्रीन गोल्ड अ‍ॅनिमेशनने आपल्या नवीनतम आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची घोषणा केली आहे. यूकेस्थित रेड काइट अ‍ॅनिमेशनसोबत विकसित होणाऱ्या ‘द असॅसिन’ या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्मचे अनावरण गोवा फिल्म फेस्टिव्हल आणि को-प्रोडक्शन मार्केटमध्ये करण्यात आले. ‘द असॅसिन’ हा त्यांच्या प्रवासातील एक नवा, धाडसी टप्पा ज्यात पहिल्यांदाच वयस्क प्रेक्षकांसाठी गंभीर, सिनेमॅटिक अ‍ॅनिमेशनकडे त्यांची वाटचाल दिसते.

ही फिल्म प्रख्यात दिग्दर्शक मार्टिन पिक लिहित असून तेच तिचे दिग्दर्शनही करत आहेत. त्यांच्या अनोख्या पेंटरली व्हिज्युअल स्टाइल, हायब्रिड फिल्ममेकिंग आणि परफॉर्मन्स-ड्रिव्हन अॅक्शनसाठी ते ओळखले जातात. स्क्रिप्ट एडिटर मार्था मॅकडायरमिड त्यांच्या सोबत पटकथा विकसित करत आहेत, तर हैदराबादमधील ग्रीन गोल्डच्या डिझाइन टीम्स चित्रपटाच्या व्हिज्युअल लुकवर काम करत आहेत.

कथा एका ताणतणावाने भरलेल्या निकट-भविष्याच्या शहरात घडते. भीषण औद्योगिक अपघातात सर्व काही गमावलेल्या एका तरुणाचा संघर्ष, शहरावर वाढत चाललेल्या कॉर्पोरेट शक्तींच्या पकडीविरुद्ध उभा राहण्याचा त्याचा निर्धार, आणि न्यायाच्या शोधात त्याच्यात घडणारा धोकादायक बदल यातून फिल्म उलगडते. हा प्रोजेक्ट भारत–यूके ऑडियो-व्हिज्युअल को-प्रोडक्शन ट्रीटीनुसार विकसित होत असून वित्तीय, क्रिएटिव्ह आणि उत्पादनाच्या सर्व टप्प्यांमध्ये दोन्ही स्टुडिओ समान भागीदार आहेत. हैदराबाद आणि यूकेमधील टीम्स मिळून लाईव्ह-अॅक्शन, रोटोस्कोपिंग आणि उच्च दर्जाच्या 2D/3D अ‍ॅनिमेशनचा समन्वय साधणारा अनोखा हायब्रिड पाईपलाईन उभारणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Green Gold Announces 'The Assassin' Animated Feature Film

Web Summary : Green Gold Animation unveils 'The Assassin,' a dark animated film co-produced with UK's Red Kite. Directed by Martin Pick, it portrays a young man's fight for justice in a dystopian future, blending live-action and animation.