Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्क्वीड गेम' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, दोन वर्षांची बंदी! धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:38 IST

स्क्वीड गेम मधील प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, दोन वर्षांची बंदी! धक्कादायक कारण समोर

लोकप्रिय वेब सीरिज 'स्क्विड गेम' चांगलीच गाजली. या सिरीजमधील दक्षिण कोरियाचा अभिनेता ओह येओंग-सू यांना अटक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. ओह येओंग-सू यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते ७९ वर्षांचे असून त्यांना ८ महिन्यांचा तुरुंगवास आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या कामावर २ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तानुसार, लैंगिक गैरवर्तन प्रकरणात सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या सेओन्गनाम शाखेने ज्येष्ठ अभिनेते ओह येओंग-सू  यांना 8 महिन्यांची शिक्षा सुनावली. याशिवाय 2 वर्षांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलंय.  त्यांना 40 तासांचे लैंगिक हिंसाचार विरोधी शिक्षण वर्गही घ्यावे लागणार आहेत.

सुवन जिल्हा न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 2017 सालचे आहे, जेव्हा ग्रामीण भागात परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या ओह येओंग-सू यांच्यावर दोन महिलांनी गैरवर्तनाचा आरोप केला होता. आता दोषी आढळल्यानंतर अभिनेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. ओह येओंग-सू यांनी त्यांंच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार पटकावले. याशिवाय 'स्क्वीड गेम' मध्ये त्यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली

टॅग्स :हॉलिवूड