Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे शकिरा नाही येणार भारतात, मुंबई अन् दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:51 IST

शकीरा हिच्या भारतातील चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.

Shakira’s India Concert : जगप्रसिद्ध आयकॉन शकीरा (Shakira) हिच्या भारतातील चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.  तब्बल १९ वर्षांनंतर एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत होणारे शकीराचे कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहेत. आयोजकांनी सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता लष्करी संघर्ष आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण वातावरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि वाढता तणाव लक्षात घेता, शकीराचा 'फिडिंग इंडिया कॉन्सर्ट' (Feeding India Concert) पुढे ढकलण्यात आला आहे. चाहते, कलाकार आणि प्रॉडक्शन टीम यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे".

ज्या चाहत्यांनी या कार्यक्रमासाठी तिकीट खरेदी केले होते, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, सर्व चाहत्यांना त्यांच्या तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील. ही रक्कम थेट त्यांच्या मूळ पेमेंट मोडवर जमा केली जाईल. कार्यक्रमाच्या नवीन तारखांबाबत सध्या विचार सुरू असून, परिस्थिती निवळल्यानंतर त्याबद्दल घोषणा केली जाईल.

शकीराचा कॉन्सर्ट १० एप्रिल रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि १५ एप्रिल रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता. तब्बल १९ वर्षांनंतर शकिरा भारतात येणार होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Shakira Cancels India Concerts in Mumbai and Delhi: Here’s Why

Web Summary : Shakira's Mumbai and Delhi concerts, scheduled for April after 19 years, have been cancelled due to rising tensions in the Middle East. Organizers prioritized the safety of attendees, artists, and the production team. Full refunds will be issued, and new dates will be announced later.
टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी