Join us
Daily Top 2Weekly Top 5

Oscar Awards 2026: 'वन बॅटल आफ्टर अनदर' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, बेस्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला? वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 08:36 IST

Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 'वन बॅटल आफ्टर अनदर' हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.  

Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. 

९८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकल बी जॉर्डन याला प्रदान करण्यात आला. 'सिनर्स' सिनेमासाठी अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाला. 

सर्वोत्कृष्ट अभिनेता - मायकल बी जॉर्डन (सिनर्स)

तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारावर अभिनेत्री जेसी बॅकली हिने नाव कोरलं. 'हॅमनेट' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेसी बॅकली (हॅमनेट)

'वन बॅटल आफ्टर अनदर' हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.  

सर्वोत्कृष्ट चित्रपट -वन बॅटल आफ्टर अनदर 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- पॉल थॉमस अँडरसन (वन बॅटल आफ्टर अनदर)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - एमी मॅडिगन (वीपन्स)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - शॉन पेन (वन बॅटल आफ्टर अनदर)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन - फ्रँकनस्टाइन 

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट - द सिंगर्स, टू पीपल एक्सचेंज सलायवा

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- सिनर्स

बेस्ट मेकअप अँड हेअरस्टायलिंग - फ्रँकनस्टाइन 

सर्वोत्कृष्ट कास्टिंग - वन बॅटल आफ्टर अनदर्स (Cassandra Kulukundis)

बेस्ट कॉश्च्युम डिझाईन - फ्रँकनस्टाइन 

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- द गर्ल व्हू क्राइड पर्ल्स 

बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म- केपॉप डेमन हंटर्स

बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट - अवतार: फायर अँड अॅश 

बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म- ऑल दी एम्प्टी रूम्स 

बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म -मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतिन

ओरिजनल स्कोर - सिनर्स

बेस्ट साऊंड- एफ वन 

फिल्म एडिटिंग - वन बॅटल आफ्टर अनदर

बेस्ट सिनेमेटोग्राफी - सिनर्स

बेस्ट ओरिजनल साँग - गोल्डन 

इंटरनॅशनल फिचर फिल्म - सेटिंमेंटल व्हॅल्यू

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ नामांकने मिळाली होती. वन बॅटल आफ्टर अनदर या सिनेमाने ६ पुरस्कार नावावर केले. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट कास्टिंग आणि सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला. तर सिनर्स चित्रपटाला मूळ पटकथा, बेस्ट सिनेमेटोग्राफी, सर्वोत्कृष्ट अभिनेता, ओरिजनल स्कोर या कॅटेगरीत पुरस्कार मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Oscar 2026: 'One Battle After Another' wins Best Picture.

Web Summary : At the 98th Oscars, 'One Battle After Another' won Best Picture. Michael B. Jordan and Jessie Buckley won Best Actor and Actress respectively. The film 'Sinners' received the most nominations.
टॅग्स :ऑस्कर