Oscar 2026: जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ९८ वा अकादमी पुरस्कार सोहळा १५ मार्च २०२६ रोजी लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध 'डॉल्बी थिएटर'मध्ये पार पडणार आहे. दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन मिळालेल्या सेलिब्रिटींना खास भेटवस्तू दिली जाते. ऑस्कर गिफ्ट बॅगचं कायमच आकर्षण आणि कुतुहलही राहिलेलं आहे. यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातही नॉमिनेट सेलिब्रिटींना तब्बल २३ लक्झरी वस्तू असलेली ऑस्करची बॅग गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे.
ऑस्कर गिफ्ट बॅगमध्ये कूपन्स, ब्युटी प्रोडक्ट आणि काही भेटवस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या गिफ्ट बॅगमध्ये व्हिला गिफ्ट कूपन्स, परदेशातील रिसोर्टचे कूपन्स याचा समावेश आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील ७ दिवसांच्या वेलनेस प्रोग्रामचं कूपनही यात देण्यात आलं आहे. स्किनकेअर, ब्युटी प्रोडक्टही या गिफ्टबॅगमध्ये आहेत. त्याबरोबरच चॉकटेल्स, ड्रायफ्रूट्, ड्रिंक्स आणि काही लक्झरी बॅग्सचा समावेशही यात करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर वॉलेट आणि फाऊंटेन पेनसारख्या महागड्या वस्तूही या गिफ्ट बॅगमध्ये असतील. या गिफ्ट बॅगची किंमत सुमारे ३.२ कोटी इतकी आहे.
भारतात कधी पाहता येणार ऑस्कर अवॉर्ड?
भारतातील प्रेक्षक हा भव्य सोहळा १६ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजल्यापासून पाहू शकतील. भारतात याचे थेट प्रक्षेपण 'स्टार मूव्हीज' चॅनेलवर केले जाणार आहे. तसेच, ज्यांना हा सोहळा ऑनलाइन पाहायचा आहे, त्यांच्यासाठी 'जिओ हॉटस्टार' (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असेल. यावर्षीच्या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट कोनन ओ’ब्रायन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे यंदाच्या सोहळ्यात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
Web Summary : The 2026 Oscars gift bag, valued at crores, includes luxury items, wellness programs, and exclusive coupons for nominated celebrities. The award ceremony will be held on March 15, 2026, and broadcast live in India on March 16.
Web Summary : 2026 ऑस्कर का गिफ्ट बैग, जिसकी कीमत करोड़ों में है, में नामांकित हस्तियों के लिए लग्जरी आइटम, वेलनेस प्रोग्राम और विशेष कूपन शामिल हैं। पुरस्कार समारोह 15 मार्च, 2026 को होगा और भारत में 16 मार्च को लाइव प्रसारण किया जाएगा।