Join us

Oops! ऑस्कर 2024 मध्ये पुरस्कार स्वीकारताना इमा स्टोनच्या ड्रेसनं दिला दगा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:24 IST

इमा स्टोनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय.

इमा स्टोन हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. ती गेल्या 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत असून आपल्या कारकिर्दीत इमानं अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. ज्यात आता चार ऑस्करचा समावेश झाला आहे. इमासाठी हे वर्ष खूप खास ठरलं आहे. कारण, यंदाही तिनं 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये चौथा ऑस्कर पटकावला आहे. यातच मात्र स्टेजवरच तिला oops moment चा सामना करावा लागला. 

इमा स्टोनला पुअर थिंग्ज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री खूप भावूक झाली. तिनं स्टेजवर येऊन सर्वांचे आभार मानले. तसेच आपले भाषण सुरू करण्यापूर्वी तिनं फाटलेला ड्रेस प्रेक्षकांना दाखवला. पण, तिच्या चेहऱ्यावर ड्रेसमुळं आलेलं टेन्शन अजिबात दिसलं नाही. तिनं अगदी व्यवस्थित परिस्थिती हाताळली. 

तर झालं असं की ऑस्करच्या मंचावर इमानं डान्स केला होता. यावेळी तिचा ड्रेस मागून फाटला. जेव्हा ती स्टेजवर पुरस्कार घेण्यास आली. तेव्हा तिच्या ही गोष्ट लक्षात आली. इमा स्टोनला 10 वर्षांनंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसरा ऑस्कर मिळाला आहे. याआधी तिला बर्डमॅन (2014) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. यासोबच तिनं 'ला ला लँड' आणि 'द फेव्हरेट'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे दोन ऑस्कर जिंकले आहेत. 

टॅग्स :ऑस्करसेलिब्रिटीहॉलिवूडसिनेमा