Join us

बिकनी ऐवजी या अभिनेत्रीनं फुलांनी झाकलं अंग, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 19:27 IST

चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग तो हटके लूक असो किंवा फोटोशूट.

बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग ते हटके लूक करतात तर कधी फोटोशूट. असं बऱ्याचदा पहायला मिळतं जेव्हा फोटोशूटमुळे कलाकार सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत असतात.  

किम कार्दिशियनने काही दिवसांपूर्वी फोटोशूट केलं. या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या फोटोंमध्ये किमने बिकनीऐवजी फुलांनी स्वतःचं अंग झाकून घेतलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस व्हायरल होताना दिसत होता.

किमने भलेही सर्जरीने परफेक्ट बॉडी मिळवली आहे. पण, या स्टाइलिंगमुळे नेहमी चर्चेत येत असते.

किमने रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टसोबत २०१४ मध्ये लग्न केले. याआधी किमची दोन लग्नं झाली होती.

किम नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते.

टॅग्स :किम कार्देशियन