Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंडल जेनरला कुणी घर देता का घर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:44 IST

हॉलिवूडची लोकप्रीय अभिनेत्री केंडल जेनर कायम तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. पण आता केंडल मीडियाच्या चर्चेत आहे, याचे कारण जरा वेगळे आहे. 

हॉलिवूडची लोकप्रीय अभिनेत्री केंडल जेनर कायम तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. पण आता केंडल मीडियाच्या चर्चेत आहे, याचे कारण जरा वेगळे आहे. होय, ही अभिनेत्री तिच्या घरामुळे चर्चेत आली आहे. केंडल तिचा बॉयफ्रेन्ड बेन सिमंस याच्यासोबत लवकरच नव्या घरात शिफ्ट होऊ शकते, असे म्हटले जातेय. याचे कारण म्हणजे, ती सध्या राहत असलेल्या घराची लीज लवकरच संपत आहे. केंडल व बेज सध्या लॉस एंजिल्समधील एका बंगल्यात राहतात.

 २५ हजार डॉलर प्रति माह भाड्याने ते या घरात राहत आहेत. पण येत्या काही दिवसांत या घराचे लीज संपणार असल्याने केंडलने नव्या घराचा शोध सुरु केला आहे. तूर्तास त्यांना वेबर्ली हिल्स भागात घर हवे आहे. पाच बेडरूम, पाच बाथरूम असलेल्या एका मॉडर्न घराचा त्यांना शोध आहे. आता हे नवे घर केंडलला लवकरात लवकर मिळो, ही अपेक्षा करूयात.केंडल एक रिअ‍ॅलिटी स्टार आणि सुपर मॉडेल आहे. केंडल कुठल्याही इव्हेंटमध्ये जावो, तिच्या ड्रेस आणि स्टाईलची चर्चा होतेचं होते. इन्स्टाग्रामवरही ती तिचे हॉट व स्टाईलिश फोटो शेअर करत असते.