Join us

कोरोनामुळे हॉलिवूडमधील या दोन दिग्गज कलाकारांचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:00 IST

या दोन्ही कलाकारांच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री ली फिएरो आणि जे बेनेडिक्ट यांचे कोरोना व्हायरसने निधन झाले असून त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि अभिनेत्याचे कोरोना व्हायरसची लागण झाल्याने निधन झाले आहे.

अभिनेत्री ली फिएरो आणि जे बेनेडिक्ट यांचे कोरोना व्हायरसने निधन झाले असून त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. ली यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांच्या जॉस या प्रसिद्ध चित्रपटात काम केले होते. त्या एक अभिनेत्री असण्यासोबतच त्यांनी आयलँड थिएटर वर्कशॉपमध्ये जवळजवळ २५ वर्षं एक दिग्ददर्शक आणि मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पाच मुले आणि सात नातवंडं आहेत.

जे बेनेडिक्ट हे ६८ वर्षांचे होते. त्यांनी अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. एलियन्स, द डार्क नाईट राइजिस यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉलिवूड