Hotness Reloaded : ...आता बियॉन्सेने शेअर केला नग्न फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 21:58 IST
काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड सिंगर बियॉन्से नोल्स हिने ‘प्रेग्नंसी’ फोटो शेअर करून जगभरातील लोकांना हैराण करून सोडले होते. आता तिने ...
Hotness Reloaded : ...आता बियॉन्सेने शेअर केला नग्न फोटो
काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड सिंगर बियॉन्से नोल्स हिने ‘प्रेग्नंसी’ फोटो शेअर करून जगभरातील लोकांना हैराण करून सोडले होते. आता तिने चक्क बेबी बम्प दाखविणारे काही नग्न फोटो शेअर केल्याने नेटिझन्समध्ये एकच धूम उडाली आहे. खरं तर बियॉन्से जे काही करतेय, ती हमखासपणे जागतिक बातमी बनत असतेय. आता तिच्या या फोटोंमुळे जगभरातील माध्यमांचे तिच्याकडे लक्ष गेले नसेल तरच नवल. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच याला तुफान लाइक्स आणि कमेंट मिळाल्यात. विशेष म्हणजे नेटिझन्सनी तिचा हा फोटो वाºयासारखा शेअरही केला. मिरर डॉट कॉम डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार बियॉन्सेने तिचे काही बेबी बम्प दाखविणारे नग्न फोटो शेअर केले आहेत. गेल्या बुधवारीच बेबी बंप दाखविणारे हॉट अॅण्ड सेक्सी फोटो शेअर करताना तिने पती जे जेड याच्यापासून जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे जाहीर केले होते. दुसºयांदा आई होणाºया बियॉन्सेने अत्यंत तोकड्या कपड्यांमधील तिचे गर्भावस्थेतील पोट दाखवणारे फोटोज् तिच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केले होते. आता तिने चक्क नग्न फोटो शेअर केल्याने एकच धूम उडाली आहे. बियॉन्सेला पाच वर्षांची ब्ल्यू आयवी नावाची मुलगी आहे. फोटोमध्ये बियोन्सेचा अंदाज खूपच हॉट आहे. मोकळ्या केसांमध्ये बियॉन्सेचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.