Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:30 IST

मोगलीचे नवीन हॉलिवूड व्हर्जन 'मोगली: लीजेंड ऑफ द जंगल' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देमोगलीचे नवीन हॉलिवूड व्हर्जन फ्रिडा पिंटो गावातील एका महिला मेसुआच्या भूमिकेत

मोगलीचे नवीन हॉलिवूड व्हर्जन 'मोगली: लीजेंड ऑफ द जंगल' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अॅन्डी सर्किसने केले आहे. 'रुडयार्ड किपलिंग' या जंगल बुकच्या कथांवर हा चित्रपट आधारित आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रांसिस्कोच्या चित्रपगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच ७ डिसेंबरला डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर जगभरात प्रदर्शित होणार आहे.

'मोगली लीजेंड ऑफ द जंगल' चित्रपटात अभिनेत्री फ्रिडा पिंटो गावातील एका महिला मेसुआची भूमिका साकारणार आहे. यासोबतच चित्रपटात क्रिश्चियन बेलने पँथरला आवाज दिला आहे. तर ब्लँचेटने साप आणि बेनेडिक्ट कम्बरबॅचने शेर खानला आवाज दिला आहे. यात रोहन चंद जंगलात वाढलेल्या मोठ्या झालेल्या मोगलीच्या भूमिकेत दिसणार आहे.  

अॅन्डी सर्किस म्हणाले की, मोगलीची कथा भावनिकरित्या रुपेरी पडद्यावर साकारायची होती. मोगलीच्या कथेचा जन्म भारतात झाला होता आणि रुपयार्ड किपलिंगदेखील भारतातीलच होते. रुपयार्डने पुस्तक लिहिले होते. तेव्हा ते छोटे होते. त्यांची पहिली भाषा हिंदी होती आणि त्यांच्या मर्जीविरोधात ब्रिटेनला पाठवले. ते अनुभवातून खूप शिकले आहेत. ही गोष्ट माझ्या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :फ्रीडा पिंटो