Join us

"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:02 IST

घटस्फोटानंतर ट्रम्प यांनी कॉल केलेला आणि डेटसाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा ६६ वर्षीय एम्मा थॉम्पसन यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एम्मा थॉम्पसन यांनी हा खुलासा केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत हॉलिवूड अभिनेत्रीने मोठा दावा केला आहे. हॅरी पॉटर फेम अभिनेत्री एम्मा थॉम्पसन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. घटस्फोटानंतर ट्रम्प यांनी कॉल केलेला आणि डेटसाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा ६६ वर्षीय एम्मा थॉम्पसन यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एम्मा थॉम्पसन यांनी हा खुलासा केला आहे. 

१९९८ मध्ये प्रायमरी कलर्स या सिनेमाचं शूटिंग करत असतानाचा एक किस्सा थॉम्पसन यांनी सांगितला. शूटिंगदरम्यान व्हॅनिटीमध्ये बसलेलं असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल आल्याचा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या, "फोन उचल्यानंतर समोरुन आवाज आला की हॅलो मी डोनाल्ड ट्रम्प बोलतोय. मला वाटलं की कोणीतरी मस्करी करत आहे. म्हणून मीदेखील मस्करीत त्यांना म्हटलं की सांगा मी तुमची काय मदत करू शकते? त्यानंतर समोरुन रिप्लाय आला की माझ्या मालकीच्या एखाद्या सुंदर ठिकाणी तुम्ही राहायला आलेलं आवडेल. आपल्याला रात्री एकत्र डिनरही करता येईल. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की धन्यवाद. आपण नक्कीच परत बोलू". 

सुरुवातीला हा प्रँक कॉल असल्याचं एम्मा थॉम्पसन यांना वाटलं होतं. पण, नंतर कळलं की तो फोन खरंच डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरी पत्नी मारला मॅप्लेस यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. आणि त्यानंतर त्यांची टीम त्यांच्यासाठी कदाचित एक चांगला लाइफ पार्टनर शोधत होती. "मला वाटतं की ते योग्य महिलेला शोधत होते. एक घटस्फोटीत महिला त्यांना हवी होती. त्यांना माझ्या ट्रेलरचा नंबरही मिळाला होता. ते मला स्टॉक करत होते(माझ्यावर नजर ठेवून होते). मी ट्रम्प यांच्यासोबत डेटवर गेले असते तर अमेरिकेच्या राजकारणाची दिशा बदलली असती", असंही एम्मा थॉम्पसन यांना म्हणाल्या. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पहॉलिवूड