Join us

बेबीज डे आऊटमधील चिमुकला झालाय २५ वर्षांचा, दिसतो प्रचंड हँडसम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 14:59 IST

बेबीज डे आऊट हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गोंडस मुलगा सगळ्यांनाच आवडला होता.

ठळक मुद्देबेबीज डे आऊट या चित्रपटात अ‍ॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आता ते दोघे २५ वर्षांचे झाले असून ते खूपच हँडसम दिसतात.

हिंदी चित्रपटांची आवड असणारे अनेकजण काही मोजकेच हॉलिवूड चित्रपट पाहातात. पण असे असूनही हॉलिवूड चित्रपटांमधील काही चित्रपट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे फेव्हरेट आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे बेबीज डे आऊट. बेबीज डे आऊट हा चित्रपट पाहिला नसेल अशी व्यक्ती सापडणे खूपच कठीण आहे. एका लहान मुलाने केलेली गंमतजमत प्रेक्षकांना बेबीज डे आऊट या चित्रपटात पाहायला मिळाली होती. हा चित्रपट १९९४ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. बेबीज डे आऊट  या चित्रपटातल्या छोट्याशा बेबीने सगळ्यांवर भुरळ घातली होती. या चित्रपटातील या गोंडस बाळाविषयी आम्ही आज एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत.

बेबीज डे आऊट या चित्रपटात आपल्याला एकच बाळ पाहायला मिळाले असले तरी प्रत्यक्षात या चित्रपटात दोन बाळांनी कामं केली आहेत. या चित्रपटाची संपूर्ण कथा ही एका बाळावरच आधारित असल्याने चित्रपटातील प्रत्येक दृशात हे बाळ असणे गरजेचे होते. त्यामुळे या चित्रपटात काम करण्यासाठी दोन जुळ्या बाळांची निवड करण्यात आली होती. एक बाळ थकलं की दुसरं बाळ चित्रीकरण करत असे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण करणे सोपे गेले होते. या चित्रपटाला आता अनेक वर्षं झाली असून या चित्रपटात काम करणारे दोन्ही कलाकार आता चांगलेच मोठे झाले आहेत.

बेबीज डे आऊट या चित्रपटात अ‍ॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आता ते दोघे २५ वर्षांचे झाले असून ते खूपच हँडसम दिसतात. या चित्रपटानंतर ते दोघेही कोणत्या चित्रपटात, अथवा कार्यक्रमात झळकले नाहीत. पण केवळ एका चित्रपटामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आई-वडील किंवा कोणीही वडिलधारी मंडळी सोबत नसताना एक छोटासा चिमुकला शहरातील विविध ठिकाणी जातो अशी बेबीज डे आऊट या प्रसिद्ध चित्रपटाची कथा होती.