Jackson Wang Marathi Video: लोकप्रिय के-पॉप स्टार जॅक्सन वांग (K-pop star Jackson Wang) नुकताच भारतात आला होता आणि तो येताच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो त्यांच्या 'मॅजिक मॅन २' या नवीन अल्बमच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जॅक्सनचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात तो मराठीत बोलताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर के पॉप स्टार जॅक्सन वांग याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ कोणत्या तरी स्टुडिओतला आहे. यावेळी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी काही चाहते तिथे आले होते. त्यांना तो फोटो काढण्यासाठी मराठीत बोलवत होता. या व्हिडीओत तो बोलताना दिसतो आहे की, ''सगळे या..सगळे या...'' या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते आहे. या पोस्टवर अभिनेता पुष्कर जोगने कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, आलो आलो थांब की... जॅक्सनचं मराठी ऐकून नेटकरी थक्क झाले आहेत.
जॅक्सन 'क्रिश ४'मध्ये झळकणार असल्याची चर्चा भारतात आल्यानंतर जॅक्सन अभिनेता हृतिक रोशनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्यानंतर तो क्रिश ४मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं. मात्र त्याने हे वृत्त फेटाळून लावलं. नुकत्याच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने म्हटले की, 'ही खोटी बातमी आहे. हा एक मोठा चित्रपट आहे, मी यापूर्वी कधीही काम केलेले नाही, त्यामुळे त्यात काम करणे माझ्यासाठी अशक्य आहे. हा माझ्या आणि त्याच्यामधील विनोद आहे. म्हणून, ते फक्त मनोरंजनासाठी होते.'
जॅक्सन वांगचा भारत दौराके-पॉप स्टार जॅक्सन वांग त्याच्या 'मॅजिक मॅन २' या नवीन अल्बमच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. हा अल्बम १८ जुलै रोजी रिलीज होणार आहे, ज्यामध्ये ११ गाणी असणार आहेत. हा अल्बम त्यांच्या २०२२ च्या मॅजिक मॅन या अल्बमचा दुसरा भाग आहे.