Join us

मुलींचा शौकीन असलेला ‘कॅण्डीमॅन’ रोज चार मुलींसोबत घालवितो रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:52 IST

‘कॅण्डीमॅन’ नावाने ओळखला जाणारा आॅस्ट्रेलियन अब्जोपती ट्रेवर बेनोन हा त्याला पडलेल्या नावापेक्षा भलत्याच कारणाने चर्चेत असतो. होय, ट्रेवर हा ...

‘कॅण्डीमॅन’ नावाने ओळखला जाणारा आॅस्ट्रेलियन अब्जोपती ट्रेवर बेनोन हा त्याला पडलेल्या नावापेक्षा भलत्याच कारणाने चर्चेत असतो. होय, ट्रेवर हा मुलींचा शौकीन असून, त्यांच्याशी सेक्स करण्यासाठी तो आसुसलेला असतो. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला रोज रात्री किमान चार मुली सेक्ससाठी लागतात. दररोज तो चार मुलींसोबत रात्र व्यतीत करीत असल्याचे खुद्द त्यानेच सांगितले आहे. खरं तर ट्रेवर बेनोन ऊर्फ कॅण्डीमॅन याची प्रतिमा प्ले बॉयची आहे. त्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती सुखी जीवन अन् संतुष्ट मन अशा विचाराने त्याला उडवायची आहे. त्यामुळेच तो दररोज चार मुलींसोबत आपल्या वेळ व्यतीत करीत असतो. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेवर विवाहित असून, त्याला चार मुले आहेत. तो त्याच्या पत्नीसोबतच राहत असला तरी, रात्रीचा वेळ तो मुलींसोबत व्यतीत करतो. या व्यतिरिक्त ट्रेवरला महागड्या गाड्यांचाही प्रचंड शौक आहे. त्यामुळे त्याच्याकडे जगभरातील महागड्या गाड्यांची रांग लागलेली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये त्याने एका रात्रीच कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला होता. पार्टीत कर्दाशियन परिवार, रॅपर टिगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्याने आमंत्रित केले होते. ट्रेवर हा अतिशय आलिशान अशी लाइफस्टाइल जगतो. पाण्यासारखा पैसा खर्च करणाºया ट्रेवरचे शौक चक्रावून टाकणारे आहेत. त्याचे घर राजमहालाहून कमी नाही. राजा-महाराजांकडे असणाºया सर्व सुखसुविधां त्याच्याकडे आहेत. यापूर्वी तो आपल्या पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवताना दिसल्यामुळे चर्चेत आला होता. आता त्याच्या रंगीन शौकमुळे तो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. हॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये ट्रेवर हे चर्चेतील नाव आहे.