Join us
Daily Top 2Weekly Top 5

 74 वर्षांचा नवरा अन् 52 वर्षांची नवरी...! ‘बिग बॉस’ची ही अभिनेत्री पाचव्यांदा बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:20 IST

‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनमध्ये ती सहभागी झाली होती.

ठळक मुद्दे Malibu बीचवर दोघांचे लग्न झाले. हा एक खासगी सोहळा होता.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री पमेला अँडरसन पांचव्यांदा बोहल्यावर चढलीय. होय, पमेलाने नुकतेच निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्नगाठ बांधली. सध्या या लग्नाची हॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.पमेला हे नाव भारतीय प्रेक्षकांसाठी नवे नाही. टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये पमेला दिसली होती. या शोच्या चौथ्या सीझनमध्ये ती सहभागी झाली होती.

(पमेला - जॉन पीटर्स)

अमेरिकन संगीतकार टॉमी ली हा पमेलाचा पहिला पती. लग्नानंतर तीनच वर्षांनी पमेलाने टॉमीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर किड रॉक या अभिनेत्यासोबत तिने लग्नगाठ बांधली होती. पण काहीच वर्षांत तिने किडसोबतही फारकत घेतली आणि निर्माता रिक सोलोमॉनसोबत तिसरे लग्न केले होते.

रिकसोबत वर्षभर संसार केल्यानंतर पामेलाने त्यालाही सोडले होते. अर्थात पाच वर्षे त्याच्यापासून दूर राहिल्यावर तिने पुन्हा सोलोमॉनसोबत लग्न केले होते. यावेळी हे लग्न टिकेल असा सर्वांचा अंदाज होता. पण हे लग्नही फार काळ टिकले नाही.

सोलोमनसोबत पुन्हा बिनसल्यानंतर पमेला काही काळ फ्रेंच सॉकर खेळाडू आदिल रामीच्या प्रेमात पडली होती. त्यासाठी तिने फ्रान्सही गाठले होते. अर्थात इतके करूनही हे नाते टिकले नाही. आता वयाच्या 54 व्या वर्षी पमेलाने निर्माता जॉन पीटर्सला जोडीदार म्हणून निवडले आहे. पमेला व जॉन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर Malibu बीचवर दोघांचे लग्न झाले. हा एक खासगी सोहळा होता.

टॅग्स :बिग बॉसहॉलिवूड