Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:35 IST

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते

हॉलिवूड अभिनेत्री  अँजेलिना जोलीला जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. अँजेलिनाने लुकिंग टू गेट आऊट सिनेमातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. अँजेलिनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती एक वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

यानंतर तिच्या आईने तिला आणि भावाला मोठं केलं.  रिपोर्टनुसार अँजेलिनाने सुरुवातीला अभिनयात रस नव्हता. मात्र जसजशी ती मोठी होऊ लागली, आईसोबत जाऊन सिनेमा पाहू लागला. तसा तिचा अभिनयातला इंटरेस्ट वाढू लागला. अँजेलिनाने तीन लग्न केली. त्यानंतर ही ती एकाकी आयुष्य जगत आहे.  

अँजेलिनाने पहिलं लग्न 28 मार्च 1996 साली जॉनी ली मिलरसोबत केले. मात्र 3 फेब्रुवारी 1999 साली दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने अमेरिकन अभिनेता बिली बॉब थार्नटनसोबत दुसरं लग्न केले मात्र 2003 मध्ये हेही नातं संपुष्टात आलं. ब्रॅड पिटसोबत ती नात्यात होती मात्र तिचं हे नातं ही फार काळ टिकलं नाही.

अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. . ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.

टॅग्स :अँजोलिना जॉली