आणि मायकल फॅसबेंडर पडला अॅलिशियाच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 16:45 IST
हॉलीवूड हॉट कपल मायकल फॅसबेंडर आणि अॅलिशिया विकांडर यांच्या प्रेमकहाणी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. दोघांची स्टोरी नेमकी सुरू कशी ...
आणि मायकल फॅसबेंडर पडला अॅलिशियाच्या प्रेमात
हॉलीवूड हॉट कपल मायकल फॅसबेंडर आणि अॅलिशिया विकांडर यांच्या प्रेमकहाणी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. दोघांची स्टोरी नेमकी सुरू कशी झाली हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. म्हणून तर हा ‘स्टीव्ह जॉब्स’ स्टार जेथे जाईल तेथे त्याला अॅलिशियाबद्दल विचारले जाते.यावरत तो फार प्रेमाने आणि शांतपणे उत्तर देतो की, ‘आम्ही काही ठरवून प्रेमात पडलो नव्हतो. किंबाहुना पहिल्यांदा भेटल्यावर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडू असे वाटले नव्हते. पण म्हणतात ना ‘प्यार किया नहीं जाता, हो जाता है!’ अगदी तसेच काहीसे झाले.’दोघांची सर्वप्रथम भेट ‘द लाईट बिटविन ओशियन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यामध्ये त्यांनी आॅन स्क्रिन दाम्पत्याची भूमिका साकारली होती. ‘रील लाईफ’ रोमान्स करता करता ‘रिअल लाईफ’ प्रेम कधी बहरले हे कळलेच नाही, असे तो सांगतो. द लाईट बिटविन ओशियनमाझ्या आयुष्यात तिच्या आगमनाने सर्व काही चांगले झाले आहे. तिच्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. सुख आणि समाधानाचा अनुभव मी घेतोय. यासाठी सर्वस्वी ती जबाबदार आहे, असेदेखील सांगायला तो विसरला नाही.