Join us

या अभिनेत्याने पत्नीच्या वडिलांवर केला आरोप, म्हटले दिल्या होत्या जीवघेण्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 17:44 IST

या अभिनेत्याची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्देजॉनी डेपची घटस्फोटीत पत्नी अंबर हर्ड आणि त्याच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जॉनीने आता अंबरच्या वडिलांनी त्याला मारून टाकण्याची धमकी दिली होती असा खळबळजनक खुलासा केला आहे.

हॉलिवुड सुपरस्टार जॉनी डेपला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. जॉनी सध्या त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. डेप आणि त्याच्या पत्नीचा वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तिने काही दिवसांपूर्वी जॉनीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. पण तिला या संदर्भात सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. 

जॉनी डेपची घटस्फोटीत पत्नी अंबर हर्ड आणि त्याच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जॉनीने आता अंबरच्या वडिलांनी त्याला मारून टाकण्याची धमकी दिली होती असा खळबळजनक खुलासा केला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार त्याने म्हटले आहे की, त्याला अंबर आणि तिच्या वडिलांनी फोन करून धमक्या दिल्या होत्या. 2016 मध्ये जॉनी आणि अंबर यांचा विवाह झाला. पण वर्षभरातच त्यांच्यात वाद व्हायला लागले. ते सतत एकमेकांवर काही ना काही आरोप करत असतात. 

जॉनी डेपने ब्लॅक मास, पब्लिक एनेमिज, डेड मॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या पायरेट्स ऑफ कॅरेबियन या चित्रपटांच्या सगळ्याच सिरिजना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. अंबरदेखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 

टॅग्स :हॉलिवूड