Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्जरीनंतर हा हॉलिवूड स्टार पुन्हा लागला चालू, कार अपघातात झाला होता जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 06:00 IST

हॉलिवूडच्या या कॉमेडियनच्या कार अपघातात पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती.

कॉमेडियन केविन हार्टच्या पाठीच्या सर्जरीनंतर आता तो चालू फिरू लागला आहे. कार अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. आता केविन हळू हळू चालत आहे पण अद्याप त्याची दुखापत पूर्ण झालेली नाही. कार अपघातानंतर त्याला सर्जरी करावी लागली होती. मिरर डॉट को डॉट युकेनं टीएमजेडला दिलेल्या वृत्तानुसार केविन हार्टला पूर्णपणे बरे व्हायला खूप वेळ लागणार आहे. फिजिकल थेरेपी सुरू होणार असून ४ महिन्यांपर्यंत चालू राहणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, लॉस अँजेलिस काउंटी येथील मुलहोलँड हायवेवर केविन हार्टचा कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यासोबत कारमध्ये दोन लोक होते. केविनच्या ड्रायव्हरने कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दरीत गेली. केविन हार्ट गंभीर जखमी झाला होता.

अमेरिकी अभिनेता केविन हार्टवर ९१व्या अकादमी पुरस्कार समारोहाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र दोन दिवसानंतर केविनने ही जबाबदारी नाकारली.

खरेतर केविनला सूत्रसंचालनाची जबाबदारी दिल्यानंतर ट्विटरवर केविनचे वर्षभरापूर्वीचे ट्विट्स रिट्विट होऊ लागले.

या ट्विट्समध्ये केविनने समलैंगिक विरोधी विचार व्यक्त केले होते. त्यावर युजर्सनेे राग व्यक्त करायला सुरूवात केली. त्यानंतर एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली. केविनने सूत्रसंचालन न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :हॉलिवूड