Join us

ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 07:00 IST

या अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे.

सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे. आपल्या भूतकाळापासून ते हॉलिवूडच्या सर्वात दिग्गजांमधील एक अभिनेत्री असलेली अ‍ॅंजेलिना फॅशन आणि ब्युटीच्या दुनियेतही लोकप्रिय आहे.अँजोलिनाने आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. अँजेलिनाने जॉनी ली मिलर याच्याशी २८ मार्च १९९६ मध्ये पहिले लग्न केलं.

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॅकरच्या चित्रीकरणावेळी दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. असं म्हटलं जातं की, ती जॉनीच्या एवढ्या प्रेमात होती की तिने रक्ताने मिलरचं नाव लिहिलं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. ३ फेब्रुवारी १९९९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अँजेलिनाचं दुसरं लग्न अभिनेता बॉब थार्नटन याच्याशी झालं. पण हे लग्नदेखील फार काळ टिकलं नाही. २००३ मध्ये ती विभक्त झाली. यानंतर २००५ मध्ये अँजेलिना आणि ब्रॅड पिटच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चांमुळे ब्रॅड पिट आणि जेनिफर एनिस्टनचं लग्न मोडलं. नंतर अनेक वर्ष अँजोलिना आणि ब्रॅड हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची सहा मुलंही आहेत. अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट २००५ सालापासून एकत्र होते.

नऊ वर्षाच्या नात्यानंतर २०१४ साली दोघे विवाहबंधनात अडकले होते. आधीच्या दोन लग्नासारखंच हे लग्नही टिकलं नाही.

अखेर दोघं वेगळे झाले आणि सध्या अँजेलिना आपल्या मुलांसोबत राहत आहे.

टॅग्स :अँजोलिना जॉलीब्रॅड पिट