'फ्रेंड्स'स्टार चँडलर म्हणजेच अभइनेता मॅथ्यू पेरीच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आता आणखी एका हॉलिवूड अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला आहे. 'गॉसिप गर्ल' फेम प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टीन ट्रेचेनबर्गचं (Michelle Trachtenberg) निधन झालं आहे. केवळ ३९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. न्यूयॉर्कमधील तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला यामुळे हॉलिवूड मनोरंजनसृष्टीत धक्का बसला आहे.
मिशेल ट्रेचेनबर्गने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही ड्रामामध्ये काम केलं होतं. काल २६ फेब्रुवारी रोजी तिच्या निधनाची बातमी पसरली. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क साऊथ येथील वन कोलंबस प्लेसमधील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये ती वास्तव्यास होती. घरातच तिचा मृतदेह आढळून आला. मात्र तिच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस याचा तपास करत आहेत. तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हॉलिवूड मनोरंजसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मिशेलने इन्स्टाग्रामवर केलेली शेवटची पोस्ट खूपच वेगळी होती. तिने लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याचीही चर्चा होती. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. 'मेलिस्सा','इन्स्पेक्टर गॅजेट','यूरो ट्रिप','ब्लॅक क्रिसमस','कॉप आउट' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच 'गॉसिप गर्ल' या लोकप्रिय वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे.