Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरचा खुलासा केल्यानंतर हिना खानने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी घाबरणार नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:51 IST

कॅन्सरशी हिना कशाप्रकारे लढा देत आहे तिच्या या प्रवासावर नुकतंच ती स्टोरी शेअर करत व्यक्त झाली आहे.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan)  ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने पोस्ट शेअर करत ही धक्कादायक माहिती दिली. यानंतर हिना खानचे चाहते चिंतेत आहेत. हिनाला स्टेज 3 कॅन्सरचं निदान झालं असून सध्या ती उपचार घेत आहे. कॅन्सरशी हिना कशाप्रकारे लढा देत आहे तिच्या या प्रवासावर नुकतंच ती स्टोरी शेअर करत व्यक्त झाली आहे.

काय आहे हिना खानची पोस्ट?

हिना लिहिते, "माझ्या प्रवासाची एक झलक... ही पोस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या सर्व धाडसी महिला आणि पुरुषांसाठी ... माझाही प्रवास इतरांसाठी असाच प्रेरणादायी असो जेणेकरुन ते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देईल. आणि लक्षात ठेवा आपल्या मनावर आणि शरीरावर जरी आघात झाला असला तरी आपण घाबरायचं नाही. न घाबरायची शपथ घेऊया."

हिना खानला सध्या सगळेच आधार देत आहेत. तिची तब्येत नक्की कशी आहे याबाबत चाहत्यांना काहीच कल्पना नाही. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सर्व कलाकारांनीही कमेंट करत तिला आधार दिला आहे.

३६ वर्षीय हिना खान बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालला गेल्या ११ वर्षांपासून डेट करत आहे. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही. लिव्ह इन मध्ये राहूनच आपण आनंदी असल्याचं ती म्हणाली होती. 

टॅग्स :हिना खानसोशल मीडियास्तनाचा कर्करोगसेलिब्रिटी