Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीची अक्षरा बहू हिना खान 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये साकारणार कोमोलिका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:32 IST

कोमोलिका लूक रसिकांना चांगलाच भावला होता.  एकता कपूर लवकरच कसौटी जिंदगी की २ रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत उर्वशीने कोमोलिका ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला निगेटिव्ह शेड्स होत्या. विशेष म्हणजे उर्वशीच्या या मालिकेतील अभिनयासह तिची स्टाईलसुद्धा प्रसिद्ध झाली होती. कोमोलिका लूक रसिकांना चांगलाच भावला होता.  एकता कपूर लवकरच कसौटी जिंदगी की २ रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.सप्टेंबर महिन्यात कसौटी जिंदगी की- २ हा शो रसिकांच्या भेटीला येईल.. सात वर्षांनंतर एकता कपूर हा शो नव्या स्टारकास्टसह पुन्हा एकदा रसिकांसाठी घेऊन येत आहे.

 

नुकतेच  ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.आजही उर्वशी ढोलकियला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत.इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते. मात्र आता कसौटी जिंदगी 2मध्ये आता नव्या स्टारकास्टनुसार कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान झळकणार असल्याचे बोलले जात आहे. श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  ऐरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे. नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 12 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. याच मालिकेत हिना खानने अक्षरा बहू बनत रसिकांची मनं जिंकली होती.एकाच मालिकेत तिने 8 वर्ष काम केले.त्यानंतर तिने या मालिकेतून एक्झिट घेत 'खतरों के खिलाडी सिझन 8' आणि त्यानंतर 'बिग बॉस सिझन 11'मध्ये झळकली होती. रिअॅलिटी शोमध्ये झळकल्यानंतर आता ती पुन्हा डेली सोपकडे वळली असून कोमोलिका या भूमिकेला ती कितपत न्याय देऊ शकते हे ही पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :हिना खान