Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खानचा ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, केस गळण्याआधीच कापले; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 11:25 IST

हिना खानच्या आईला अश्रू अनावर, लेकीनेच दिला धीर, म्हणाली, 'प्रार्थना करा...'

अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची धक्कादायक बातमी दिली. हिनाला 3rd स्टेज ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. या कठीण परिस्थितीतही ती पॉझिटिव्ह राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तिची जिद्द, हिंमत पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. हिनाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कॅन्सरमध्ये केस गळण्याआधीच तिने आपले लांबसडक केस कापले आहेत. हा भावूक व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

प्रत्येक मुलीसाठी तिचे केस म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. केस गळाले तरी वाईट वाटतं. पण कॅन्सरमध्ये सगळेच केस जातात तेव्हाचं दु:ख शब्दात वर्णन करता येणारं नाही. अभिनेत्री हिना खानने आधीच आपले केस कापत कॅन्सरला तिच्यापरीने  जणू हरवण्याचाच प्रयत्न केला आहे. यावेळी तिला आणि तिच्या आईलाही अश्रू अनावर झाले. हिना लिहिते, 'माझ्या आईचा रडणारा आवाज तुम्हाहा ऐकू येत असेल. जे तिनेही कधीच कल्पना केली नसेल त्यासाठी ती स्वत:ला तयार करत आहे. माझ्यासारखाच कॅन्सरशी लढा देणाऱ्या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. मला माहितीये हे फारच कठीण आहे. अनेकांसाठी केस म्हणजे डोक्यावरचं मुकूटच आहे. पण कॅन्सरशी लढा देताना जेव्हा हेच केस जातात तेव्हा तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि मी हा लढा जिंकण्याचा निर्णय घेतला आहे."

ती पुढे लिहिते,"मी जिंकण्याची एकही संधी सोडणार नाही. माझे सुंदर केस गळण्याआधीच मी कापले आहेत. नंतर या भावूक क्षणातून जाण्यापेक्षा मी आताच केस कापले. कारण माझं मुकूट हे माझी जिद्द, माझं बळ आणि माझं स्वत:वर असलेलं प्रेम यातच आहे. आणि हो, मी माझे हेच केस मी या प्रवासात विग म्हणून वापरणार आहे. केस परत येतील, भुवयाही येतील, शरीरावरचे व्रण मिटतील, पण जिद्द तशीच राहील. मी माझा हा प्रवास रेकॉर्ड करणार आहे जेणेकरुन माझ्यासारख्याच इतरांनाही यातून बळ मिळेल. या दिवशी माझ्यासोूत असणारे रॉकी, माझी आई सर्वांचे आभार. देव मला कॅन्सरशी लढा देऊन जिंकण्याची ताकद देवो. माझ्यासाठी प्रार्थना करा."

टॅग्स :हिना खानटेलिव्हिजनस्तनाचा कर्करोगसोशल मीडिया