ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - राखी सावंत व सेलिना जेटली या अभिनेत्रींनी सनी लिओनवर तिखट शब्दात टीका केली असली तरी सनी लिओनला त्यांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. मी भारतात चांगले काम करण्यासाठी आले असून मला अशा लोकांकडे लक्ष द्यायचे नाही असे सडेतोड उत्तर सनी लिओनने दिले आहे.
काही दिवसांपूर्वी राखी सावंतने सनी लिओनवर टीका करत तिला भारतातून हाकलून लावा असे म्हटले होते. तर सनी व तिचा पती घर अस्वच्छ ठेवत असल्याने सेलिना जेटलीने दोघांनाही तिच्या घरातून बाहेर काढले होते. या प्रकारावर अखेर सनी लिओनने प्रतिक्रिया दिली आहे. सनी म्हणते, त्यांनी केलेले आरोप निराधार व अर्थहिन आहेत. एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याने अशा शब्दात बोलणे शोभत नाही. मी भारतात चांगले काम करायला असून मी फक्त त्याच्यावरच लक्ष देईन असेही तिने सांगितले.