Join us

अमेय वाघच्या पत्नीला पाहिलंत का?, शेअर केला तिचा स्पेशल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 19:22 IST

अमेय वाघने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने चित्रपट, मालिका, रंगभूमी आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. अमेय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमेय वाघची पत्नी साजिरीचा आज वाढदिवस असून या निमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर तिच व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की,  मी गेली अनेक वर्षे तिच्या वेडेपणाच्या प्रेमात आहे ! पण वेडेपणा ज्या मुलीच्या प्रेमात आहे त्या मुलीला हॅप्पी हॅप्पी बर्थडे. 

अमेय वाघ २०१७ साली लग्नबेडीत अडकला. १३ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरी देशपांडेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली.

साजिरी अमेयच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला जायची. अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि इथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. अमेयची पत्नी साजिरी दिसायला खूपच सुंदर आहे. अमेय तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. 

अमेय वाघच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर दिल दोस्ती दुनियादारी ही त्याची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. लवकरच तो 'झोंबिवली' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :अमेय वाघ