बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर शाहिद कपूरच्या ‘हैदर’ या चित्रपटातील अभिनयाने मंत्रमुग्ध झाला आहे. शाहिदच्या ‘हैदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहिदच्या अभिनयाने अनेकांना प्रभावित केले आहे. करण जोहर म्हणाला की, ‘हैदरचा ट्रेलर पाहून असे वाटते की, हा चित्रपट फक्त कलाकार नव्हे, तर अभिनयानेही परिपूर्ण असेल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. ‘हैदर’ शाहिदच्या आजवरच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल, असा मला विश्वास आहे.’ ‘हैदर’ या चित्रपटात शाहिदने एका काश्मिरी युवकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहिदसह तब्बू, श्रद्धा कपूर, इरफान खान मुख्य भूमिकेत आहेत. विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २ आॅक्टोबरला रिलीज होईल.
अॅक्शन चित्रपट करायचे आहेत
By admin | Updated: October 22, 2014 04:30 IST