Join us
Daily Top 2Weekly Top 5

 ‘या’ अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स, पण तरीही मिळाले नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 12:04 IST

बॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात. यातले काही चेहरे ‘स्टार’ म्हणून मिरवतात. तर काही ‘फ्लॉप’ म्हणून अचानक गायब होतात. एका रात्रीत ‘स्टार’ झालेले पण पुढे शर्यतीतून बाद झालेलेही येथे अनेक भेटतील. सात वर्षांपूर्वी असाच एक चेहरा बॉलिवूडमध्ये दिसला.

ठळक मुद्देगतवर्षी ४ डिसेंबरला गुवाहाटीचा  हॉटेल मालक अर्जुन देबसोबत लग्न केले.

बॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात. यातले काही चेहरे ‘स्टार’ म्हणून मिरवतात. तर काही ‘फ्लॉप’ म्हणून अचानक गायब होतात. एका रात्रीत ‘स्टार’ झालेले पण पुढे शर्यतीतून बाद झालेलेही येथे अनेक भेटतील. सात वर्षांपूर्वी असाच एक चेहरा बॉलिवूडमध्ये दिसला. हा चेहरा होता पाओली दाम हिचा. पाओलीचे डेअरिंग इतके की, पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तिने जबरदस्त इंटीमेट सीन्स दिलेत. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघल्या. या बोल्डनेसने भलेही तिला ओळख मिळाली. पण करिअरमध्ये याचा तिला काहीही फायदा झाला नाही.‘हेट स्टोरी’मधून बॉलिवूड एन्ट्री करणा-या याच बोल्ड पाओलीचा आज वाढदिवस. 

पाओली ही मुळात बंगाली अभिनेत्री. पण तिला बॉलिवूडचा मोह झाला आणि ‘हेट स्टोरी’मधून तिने डेब्यू केला. या चित्रपटात पाओलीने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या त्या बोल्ड सीन्सची भलतीच चर्चा झाली होती. ‘हेट स्टोरी’ सुपरहिट झाला. पण पहिलाच चित्रपट सुपरहिट होऊनही पाओली अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. यानंतर एकाही चित्रपटात ती झळकली नाही. साहजिकच तिने बंगाली चित्रपटांकडे परतली.

  गतवर्षी ४ डिसेंबरला गुवाहाटीचा  हॉटेल मालक अर्जुन देबसोबत लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षे आधीपासून पाओली व अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते.अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर पाओलीचे हनिमून चांगलेच गाजले होते.

होय, लग्नानंतर पाओली व अर्जुन स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित डेस्टिनेशनवर हनीमूनला पोहोचले होते.  रोमान्ससाठी  परफेक्ट असलेले हे डेस्टिनेशनच पाओली व अर्जुनसाठी संकट ठरले होते. पाओली व अर्जुन या डेस्टिनेशनवर पोहोचताच येथे प्रचंड हिमवृष्टी सुरु झाली होती. दोघेही एका स्की रिजॉर्टमध्ये थांबले होते. हिमवृष्टीमुळे या रिजॉर्टचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. एकीकडे रेल्वे मार्ग, रस्ते सगळे काही बंद होते आणि दुसरीकडे अर्जुन व पाओली दोघांचीही प्रकृती बिघडली होती. इतकी की,  दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर बोलवावे लागले होते. 

पाहा, पाओलीचे काही हॉट फोटो...

 

टॅग्स :बॉलिवूडस्वित्झर्लंड