Join us

हरभजन करणार सिगिंगमध्ये डेब्यू

By admin | Updated: July 10, 2017 02:54 IST

हरभजन सिंग आपली एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला आहे.

हरभजन सिंग आपली एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला आहे. मैदानानंतर तो आता तुम्हाला रेकॉर्डिंग स्टुडिओत दिसणार आहे. सध्या हरभजन खास तयारी करताना दिसतो आहे. हरभजनने सध्या गाणं शिकायला सुरुवात केली आहे. शास्त्रीय संगीताचे धडे तो गिरवतो आहे. स्टुडिओत जाऊन सुद्धा तो रियाज करतो आहे. हरभजन मैदानाबरोबरच टीव्हीवर अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसला होता. डान्स स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. यानंतर हरभजन आता सिगिंग क्षेत्रात डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर हरभजनला आॅलराऊंडर म्हटले तर ते वावगे ठरु नये. डिसेंबर महिन्यात त्याचे गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. हे त्याचे सोलो साँग असणार आहे. या गाण्याला मिथुनने म्युझिक दिले आहे. या गाण्याच्या माध्यमातून देशातल्या खऱ्या हिरोंना सलाम करण्यात येणार असल्याचे समजते आहे. हे गाणं अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश आहे. हे गाण देशातल्या वेगवेगळ्या भागांवर चित्रित केले आहे.