Join us

प्रिया बापट का बरं झालीय हॅप्पी...?

By admin | Updated: March 13, 2016 21:15 IST

सतत आनंदी राहिल्याने आयुष्य वाढते असे म्हणतात, ते खरेच आहे. लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शनच्या झगमगाटात वावरणारे हे कलाकारदेखील त्यांच्या आयुष्यात काही हॅप्पी मोमेंट्स याव्यात, याच्या प्रतीक्षेत असतात

सतत आनंदी राहिल्याने आयुष्य वाढते असे म्हणतात, ते खरेच आहे. लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शनच्या झगमगाटात वावरणारे हे कलाकारदेखील त्यांच्या आयुष्यात काही हॅप्पी मोमेंट्स याव्यात, याच्या प्रतीक्षेत असतात. आता पाहा ना, आपली चुलबुली गर्ल प्रिया बापट म्हणतेय, ‘देअर आर सो मेनी ब्यूटिफुल रिझन्स टू बी हॅप्पी...’आता अशा काय आनंदाच्या घटना तिच्या लाइफमध्ये घडल्या आहेत की, ती इतकी हॅप्पी झालीय, असे वाटत असेल, तर प्रियाच पुढे सांगतेय, यातील नक्की कोणत्या गोष्टीमुळे माझ्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे हे मलाही माहीत नाही. ‘सीएनएक्स’शी बोलताना प्रिया खूपच हॅप्पी होती. ती सांगते, ‘मी सकाळी जीमवरून गाडीवरून घरी येत असताना अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मला कशाचे हसू आले माहीत नाही. कारण आपल्या आयुष्यात आनंदी होण्याची बरीच कारणे असतात.’नुकतीच प्रिया सिडनीच्या लाँग हॉलिडेवरून आली आहे. याबाबत ती सांगते, ‘आम्ही खूप एंजॉय केले. पहिल्यांदा सिडनीत मोठ्या रस्त्यांवरून सायकलिंग केले. आता पुन्हा आल्यावर माझे रूटिन सुरू झाले आहे. जीम, वर्कआउट या गोष्टींमुळे मला नेहमी ऊर्जा व प्रेरणा मिळते. कदाचित, त्यामुळेदेखील मी हॅप्पी असू शकते.’ नक्कीच प्रिया, तू अशीच हसत अन् सतत आनंदी राहा. यासाठी तुला ‘सीएनएक्स’ टीमकडून शुभेच्छा.