Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई-प्रियाच्या भूमिकेत असा झाला बदल

By admin | Updated: September 21, 2016 02:47 IST

कोणत्याही चित्रपटात दोन नावाजलेल्या अभिनेत्री एकत्र काम करणार, म्हणजे सर्वांत जास्त टेन्शन निमार्ता आणि दिग्दर्शक यांनाच असते.

कोणत्याही चित्रपटात दोन नावाजलेल्या अभिनेत्री एकत्र काम करणार, म्हणजे सर्वांत जास्त टेन्शन निमार्ता आणि दिग्दर्शक यांनाच असते. चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींना भूमिका समान दर्जाच्या देणे गरजेचे असते. ‘वजनदार’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोन आघाडीच्या अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. गंमत म्हणजे, या चित्रपटात या दोघींना ज्या भूमिका देण्यात आल्या होत्या, त्या त्यांना अजिबात आवडल्या नव्हत्या. सईला प्रियाची भूमिका करायची होती, तर प्रियाला सईची. दोघीही आपल्या निर्णयावर ठाम होत्या. यानंतर निर्मात्याने जेवणाचा बेत आखून दोघींना एकत्र आणले. या वेळी सई आणि प्रिया यांना त्यांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यानंतर त्यांनी या भूमिका करण्यास लगेच होकार दिला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी यांच्यादेखील भूमिका आहेत.