Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रंगून’साठी कंगणाने बदलली हेअर स्टाईल

By admin | Updated: November 23, 2015 01:38 IST

कंगणा राणावत ही तिच्या वेगळ्या भूमिका आणि अ‍ॅक्टिंग यांच्यासाठी ओळखली जाते. तिचा बोल्ड लुक आणि कसदार अभिनय यांच्यामुळे

कंगणा राणावत ही तिच्या वेगळ्या भूमिका आणि अ‍ॅक्टिंग यांच्यासाठी ओळखली जाते. तिचा बोल्ड लुक आणि कसदार अभिनय यांच्यामुळे ती प्रेक्षकच्या मनात घर करते. सध्या ती आगामी चित्रपट ‘रंगून’ साठी शूटिंग करत आहे. यातील तिची भूमिका काहीशी वेगळी आहे. त्यासाठी ती विशेष मेहनत घेत आहे. अभिनेत्रींसाठी अनिवार्य नाही की त्यांनी नेहमीच केस मोकळे सोडून भूमिका कराव्यात. तिने तिच्या आगामी चित्रपटासाठी केस बांधून घेतले आहेत. यात ती ज्युलियाचे कॅरेक्टर करत आहे. मेरिलियन मॉनरोई यांच्या कॅरेक्टरपासून ज्युलिया या कॅरेक्टरची प्रेरणा घेतली आहे. बांधलेल्या केसांशिवाय तिने लाल लिपस्टिक आणि हॉल्टर नेक ड्रेस घातलेला आहे. या लुकसाठी तिला स्टाईलिस्ट अधुना अख्तर हिने मदत केली आहे.