Join us

‘गुरन’ नेहमी हृदयात राहील : आमीर

By admin | Updated: January 18, 2016 03:05 IST

लगानमधील गुरनची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे नुकतेच निधन झाले. लगान आणि स्वदेससारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाच्या जोरावर रसिकांची पसंती

लगानमधील गुरनची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे नुकतेच निधन झाले. लगान आणि स्वदेससारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाच्या जोरावर रसिकांची पसंती मिळवलेल्या राजेश विवेक यांच्या निधनाबद्दल अभिनेता आमीर खानने दु:ख व्यक्त केले असून, गुरन नेहमी आमच्या हृदयात राहील, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमीर खानची निर्मिती असलेल्या लगानमध्ये काम करताना राजेश विवेक यांच्यातले स्पीरिट, ऊर्जा आणि मानवीय प्रेमभावना शब्दांत व्यक्त करण्यापलीकडची होती, असेही आमीरने म्हटले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी १९७८ मध्ये प्रथम जुनूनमध्ये गुरनला संधी दिली होती. त्यानंतर साधारण ३० चित्रपटांमध्ये राजेश विवेक यांनी काम केले आहे. त्यापैकी बंटी और बबली, भूत अंकल, व्हॉट इज युवर राशी, अग्निपथ, सन आॅफ सरदार, डिश्कॅव अशा काही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.