फेसबुक, टिष्ट्वटर या सोशल मीडियामुळे सेलीब्रिटी चाहत्यांच्या क नेक्शनमध्ये राहत आहेत. सेलीब्रिटींसाठीही सोशल मीडिया जॉइन करणे तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. नुकतीच ‘शानदार’मधून सनाह कपूर या शाहीद कपूरच्या बहिणीने एन्ट्री केली. तिला समीक्षक आणि प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गुलाब्बो गर्ल असलेल्या सनाहने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्याचा विचार पक्का केला आहे. ती म्हणते, ‘मला चित्रपटातून मिळालेला प्रतिसाद पाहता खूपच आनंद होत आहे. मी जरी सोशल मीडियावर येण्याचा विचार केला तरी आता मी सुरुवात करत आहे.
‘गुलाब्बो गर्ल’ सोशल मीडियावर
By admin | Updated: November 15, 2015 01:55 IST