गोविंदा त्याच्या ‘किल दिल’ आणि ‘हॅप्पी एंडिंग’ या चित्रपटांबाबत खूप खुश आहे. कारण बऱ्याच काळानंतर गोविंदा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्याने केलेले काही चित्रपट रिलीज झाले, तर काही चित्रपट त्याने साईन केले नाहीत. क्वीनचा दिग्दर्शक असलेल्या विकास बहलने त्याच्या आगामी ‘शानदार’ या चित्रपटात एक भूमिका गोविंदाला आॅफर केली होती; पण गोविंदाने ही भूमिका करायला नकार दिला. हा चित्रपट सोडण्याचे कारण सांगताना गोविंदा म्हणाला की, ‘मी ‘शानदार’ करायला मंजुरी दिली होती, शूटिंग सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी त्याने मला सांगितले की, तो सेटवरच मला कहाणी ऐकवेल. मी नकार दिला. कारण मी अशा प्रकारे काम करीत नाही.’
गोविंदाने का नाकारली शानदारची आॅफर
By admin | Updated: October 24, 2014 03:11 IST