मराठी चित्रपटांचे आकर्षण आता हिंदीतील स्टार्सनाही वाटू लागले असून डान्सिंग गोविंदा आता मराठी चित्रपटात अवतरतोय. तेही एका खेडुताच्या भूमिकेत. देवदत्त मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटातून गोविंदाचे मराठीत आगमन होतेय. त्याचे शूटिंगही सुरू झाले असून पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होईल. गोविंदाचा स्वत:चा असा वेगळा प्रेक्षकवर्ग. म्हणायला उत्तर भारतीय असला तरी तो खरा मराठीच. विरारमध्ये वाढलेला. त्यामुळे मराठी चित्रपट त्याला नवे नाहीत. परंतु, आजपर्यंत गोविंदाने मराठी चित्रपटात येण्याचा विचार केला नव्हता. मात्र, आता त्याचे पदार्पण होत आहे. त्याच्याबरोर विनोदवीर जॉनी लिव्हरही असणार आहे म्हणे.
गोविंदा मराठीत अवतरणार
By admin | Updated: July 10, 2015 02:58 IST