Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीनं वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 11:29 IST

एका अभिनेत्याच्या पत्नीने वाईन पिण्यासाठी धर्म बदलला.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेते हे तर कायमच चर्चेत असतात. पण, त्यांच्या पत्नीदेखील कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आपल्या आवडत्या अभिनेत्यांच्या पत्नी काय करतात, त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक असतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्यांच्या पत्नीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण, या अभिनेत्याच्या पत्नीने वाईन पिण्यासाठी थेट धर्मच बदलला. 

ज्याच्या पत्नीनं  वाईन पिण्यासाठी थेट धर्मच बदलला तो बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' गोविंदा (Govinda) आहे. होय,  वाईन पिण्यासाठी धर्म बदलणारी ही व्यक्ती गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आहे. खुद्द सुनीता आहुजा यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला.  नुकतंच सुनिता यांनी 'टाइमआऊट विथ अंकिता' या पॉडकास्टमध्ये सांगितलं, "माझा जन्म वांद्रेमध्ये झाला. मी एका ख्रिश्चन शाळेत होते आणि माझे सर्व मित्र ख्रिश्चन होते. येशूचे रक्त म्हणजे वाईन आहे, असं मी लहानपणी ऐकलं होतं. मग मी विचार केला, वाईन म्हणजे दारू. मी खूप हुशार होते. दारू प्यायल्याने काही होत नाही, हो ना? मग मी वाईनसाठी ख्रिश्चन झाले".

पुढे सुनिता म्हणाल्या, "मी अजूनही ख्रिश्चन धर्माचे पालन करते आणि प्रत्येक शनिवार चर्चला जाते". ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने तिचे आई-वडील तिच्यावर नाराज झाले होते का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, " त्यांना कधी कळालंच नाही". त्या पुढे म्हणाल्या, "मी दर्गा, गुरुद्वारा आणि मंदिरातही जाते. आठवडाभर वेगवेगळे उपवास करते आणि काही विशिष्ट दिवशी मांसाहार करणे टाळते". दरम्यान, तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर सुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन अपत्ये आहेत. टीनाने अभिनयात नशीब आजमावलंय, तर यशवर्धन त्याच्या पदार्पणाची तयारी करत आहे.

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटी