Join us

ऑनलाइन डेटिंगवर गोविंदाच्या मुलीचा येतोय नवा सिनेमा, रवीनाने शेअर केले डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 14:20 IST

अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर टीनाचा हा नवा सिनेमा प्रमोट केला आहे तिने ट्विट करत लिहिले की, 'एक मस्त शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे.

अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहूजा तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तिची शॉर्टफिल्म 'ड्रायव्हिंग मी क्रेझी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही शॉर्टफिल्म ऑनलाइन डेटिंगवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. सिनेमाचा गोल आजच्या तरूण पिढीला टार्गेट करणं आहे. या शॉर्टफिल्मचा टीझर आधीच रिलीज झाला आहे. 

अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर टीनाचा हा नवा सिनेमा प्रमोट केला आहे तिने ट्विट करत लिहिले की, 'एक मस्त शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. माझी मैत्रीण पूर्णिमा लामछानेने ही शॉर्टफिल्म डिरेक्ट केली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये टीना आहुजासोबत मुदित नायर दिसणार आहे. दोघांची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडू शकते. 

या शॉर्टफिल्मसाठी टीना चांगलीच उत्साही आहे. तिला आशा आहे की, तिची ही शॉर्टफिल्म आजच्या पिढीला रिलेट करेल. एका न्यूज पोर्टलला तिने सांगितले की, प्रेमाच्या शोधात आजकाल लोक नवनवीन अ‍ॅप्सचा वापर करतात. एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करतात. अनेक अ‍ॅप्सबाबत तर त्यांना माहितीही नाही. अशात सिनेमाचा हा मुद्दा त्यांना समजेल.

टीनानुसार, तिला हा सिनेमा करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही. कारण दिग्दर्शिका पूर्णिमा यांनी दिग्दर्शक म्हणून इतकं चांगलं काम केलं आहे की, कलाकारांचं काम सोपं झालं. तसेच टीनाने सहकलाकार मुदित नायरचीही प्रशंसा केली आहे. ती म्हणाली की, मुदित एका शानदार कलाकार आहे. तो फार चांगला अभिनय करतो. माझी अशी इच्छा आहे की, या टीमसोबत आणखीही काही सिनेमात काम करावं. 

अशात आता प्रेक्षकांना गोविंदाच्या मुलीची ही शॉर्टफिल्म किती आवडते हे तर येणारे दिवस दाखवतील. टीनाने याआधी 'सेकेंड हॅंड हसबन्ड'सारख्या सिनेमात काम केलं आहे. पण त्यावेळी तिला फारसा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. 

टॅग्स :गोविंदाबॉलिवूड