Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर... बाप बनणार आहे कपिल

By admin | Updated: July 3, 2014 13:45 IST

रिअल लाईफमध्ये कपिल शर्माचे लग्न झालेले नाही, त्यामुळे तो बाप बनण्यास अवकाश आहे; पण कॉमेडी नाईटस् विथ कपिलमध्ये तो लवकरच बाप बनण्याची शक्यता आहे.

रिअल लाईफमध्ये कपिल शर्माचे लग्न झालेले नाही, त्यामुळे तो बाप बनण्यास अवकाश आहे; पण कॉमेडी नाईटस् विथ कपिलमध्ये तो लवकरच बाप बनण्याची शक्यता आहे. कॉमेडी नाईटस्ने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे, हा प्रसंग साधून कॉमेडी नाईटस्मधील कपिलची पत्नी सुमोना चक्रवर्ती ऊर्फ मंजूने फेसबुक पेजवर लिहिले आहे की, ‘शर्मा जी एक वर्ष पूर्ण झाले. आता दादीला नातू देऊन टाकूया.’ या कमेंटमुळे तर्क लावला जातोय की, लवकरच कॉमेडी नाईटस्मध्ये कपिलच्या मुलाच्या रूपात नवा कलाकार एंट्री करणार आहे. कपिलने सुमोना आणि त्याचा फोटो फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.