Join us

आवाज इतिहासातील सोनेरी पानांचा

By admin | Updated: June 27, 2016 00:31 IST

थोर आणि क्रांतिकारी व्यक्तींच्या कथा सांगणारी ‘आवाज’ ही मिनी सीरियल लवकरच कलर्स मराठी वाहिनी घेऊन येत आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची पाने उलगडत, या मातीतील काही थोर आणि क्रांतिकारी व्यक्तींच्या कथा सांगणारी ‘आवाज’ ही मिनी सीरियल लवकरच कलर्स मराठी वाहिनी घेऊन येत आहे. आजच्या पिढीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात घेऊन जाऊन मोजक्या दहा एपिसोडमध्ये संत ज्ञानेश्वरांची अगाथ गाथा सांगण्याचा प्रयत्न या मिनी सीरियलमधून होणार आहे. संत ज्ञानेश्वर या सीरियलनंतर, महात्मा फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास ‘आवाज’च्या माध्यमातून उलगडला जाईल. २७ जूनपासून हे एपिसोड पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले यांनी साकारली आहे.