Join us

मराठमोळ्या नेहा पेंडसेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, म्हणते - बिनधास्त रहा...!

By तेजल गावडे | Updated: November 16, 2020 06:00 IST

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नेहाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यात ती बिनधास्त अंदाजात दिसते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. नेहाने हे फोटो शेअर करत लिहिले की, बिनधास्त रहा आणि भीती घालवा अन् पाहिजे ते करा. नेहा या फोटोत खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत..याशिवाय नेहा 'सुरज पे मंगल भारी' या हिंदी चित्रपटात झळकली आहे.

सुरज पे मंगल भारी चित्रपटात नेहा शिवाय अन्नू कपूर, सुप्रिया पिळगावकर, विजय राज, सीमा पाहवा, मनोज पाहवा, नीरज सूद, मनुज शर्मा, वंशिका शर्मा, करीश्मा तन्ना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :नेहा पेंडसे