Join us  

पत्नीसाठी वाट्टेल ते! 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर नागराज मंजुळेंनी बायकोला दिलं खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 4:49 PM

Nagraj manjule: नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे.

नागराज मंजुळे (nagraj manjule) हे नाव मराठीसह बॉलिवूडमध्येही आता चांगलंच गाजलं आहे. 'सैराट' (sairat), पिस्तुल्या (pistulya), 'फ्रँडी' , 'झुंड' या दर्जेदार सिनेमांनंतर नुकताच त्यांचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आकाश ठोसर (akash thosar), सायली पाटील (sayali patil) आणि सयाजी शिंदे (sayaji shinde)यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची चर्चा रिलीज होण्यापूर्वीच सुरु झाली. त्यामुळे सध्या हा चित्रपट चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे दरवेळी दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणारे नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. घर बंदूक बिरयानीच्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळे आणि त्यांच्या 'घर बंदूक बिरयानी'च्या संपूर्ण टीमने 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत नागराज यांनी त्यांच्या सिनेमाविषयी भाष्य केलं. यावेळी चित्रपटाविषयी बोलत असतानाच त्यांनी सेटवर आपल्या पत्नीचा वाढदिवस कशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला हे सांगितलं.

सायली की रिंकू; दोघींपैकी 'ही' अभिनेत्री आहे आकाशच्या सर्वात जास्त क्लोज

या मुलाखतीमध्ये सयाजी शिंदे यांना चित्रपटाच्या निवडीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच चित्रपटाची निवड कशी केली आणि सेटवर आपलं वृक्षारोपणाचं प्रेम कसं जपलं हे सांगितलं. विशेष म्हणजे सयाजी शिंदे बोलत असतानाच नागराज मंजुळे यांनी 'सेटवर आम्ही वृक्षारोपण केलं', असं आवर्जुन सांगितलं.

नागराज मंजुळेंचा सख्खा भाऊ आहे अभिनेता; अमिताभ बच्चनसोबत केलं काम

"आम्ही सिनेमाच्या सेटवर काही झाडं सुद्धा लावली. सया दादाने (सयाजी शिंदे) आणि आम्ही मिळून सेटवर बरीच झाडं लावली.ज्या फार्महाऊसवर आम्ही राहत होतो तेथे ही झाडं लावली", असं नागराज मंजुळे म्हणाले. त्यांचीच री ओढत, "गार्गीचा वाढदिवस आम्ही झाडं लावून साजरा केला", असं सयाजी शिंदे म्हणाले. त्यांच्या या वाक्याला नागराज मंजुळे यांनीही दुजोरा दिला.

दरम्यान, नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमामध्ये आकाश ठोसर, सायली पाटील ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर, सयाजी शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच नागराज मंजुळे पोलिसांच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले. 

टॅग्स :नागराज मंजुळेसिनेमाआकाश ठोसरसयाजी शिंदेसेलिब्रिटी