Tap to Read ➤

नागराज मंजुळेंचा सख्खा भाऊ आहे अभिनेता; अमिताभ बच्चनसोबत केलं काम

'घर बंदूक बिरयानी'मध्येदेखील नागराज यांचा भाऊ झळकणार आहे
मराठी कलाविश्वातील गाजलेला दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे.
'सैराट', 'पिस्तुल्या', 'झुंड', 'फँड्री' यांसारखे गाजलेले सिनेमे नागराज यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले.
लवकरच नागराज यांचा घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'घर बंदूक बिरयानी'मध्ये नागराज यांचा धाकटा भाऊदेखील झळकणार आहे.
नागराज यांच्या धाकट्या भावाचं नाव शेषराज पोपटराव मंजुळे असं आहे.
नागराज आणि शेषराज या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.
शेषराज यांना घरी आप्पा या नावाने हाक मारतात.
'झुंड' या सिनेमाच्या निमित्ताने शेषराज यांनी अमिताभ बच्चनसोबत काम केलं.
क्लिक करा